आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !

आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !
आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !
आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !Canva
Summary

पीओपी व शाडूच्या मूर्तीलाही पर्याय म्हणून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या निर्मितीचा नवा टप्पा म्हणजे "गोमय गणेश मूर्ती' होय.

सोलापूर : पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्ती विसर्जनानंतर अनेक वर्षे विरघळत नसल्याने व त्यावरील रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण (Water Pollution) होऊन जलस्रोताला व जलीय पर्यावरणाला धोका ठरत असल्याने पीओपी मूर्तीला पर्याय म्हणून शाडूच्या गणेशमूर्तीचा पर्याय समोर आला. मात्र शाडूच्या मूर्ती विसर्जनानंतरही तलाव व विहिरीत मातीचा गाळ साचण्याचा धोका समोर येत आहे. त्यामुळे पीओपी व शाडूच्या मूर्तीलाही पर्याय म्हणून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या निर्मितीचा नवा टप्पा म्हणजे 'गोमय गणेश मूर्ती' (Gomay Ganesh idol) होय. गाईच्या शेणापासून या मूर्ती तयार करण्याचे काम सोलापुरातील (Solapur) शेळगी (Shelgi) येथील गणेश गुंडमी (Ganesh Gundami) हे करीत आहेत.

आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !
यंदा 330 गावांत 'एक गाव-एक गणपती'! 'असा' साजरा होणार उत्सव

विशेष म्हणजे, विसर्जनानंतर काही तासांत विरघळणारे मूर्तीचे अवशेष जलीय प्राण्यांसाठी खाद्य बनते. तर वनस्पतीसाठी खत म्हणून उपयोगाला येते. यामध्ये बिया टाकल्या तर त्याला खत मिळून नवीन रोप तयार होते. या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत असून, ऍगस्टमध्येच पुणे, बंगळूर व ठाणे आदी शहरांतून या मूर्तींची दोन हजारांपेक्षा अधिक बुकिंग झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या प्रयोगाची दखल घेत मूर्ती मागवून घेतली आहे.

पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा नवा टप्पा म्हणजे गोमय गणेश मूर्तींची निर्मिती सोलापुरात सुरू झाली आहे. तब्बल दोन हजार गणेश मूर्तींची बुकिंग ऑगस्ट अखेरीस संपली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मागणी पुणेकरांकडून नोंदवली गेली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या निर्मितीची दखल घेत ही मूर्ती प्रायोगीक निर्मितीसाठी मागवून घेतली आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांकडून अनेक नावीन्यपूर्ण गणेश मूर्तींचे प्रकार केले जात आहेत. आतापर्यंत शाडूच्या गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक म्हणून तयार केल्या जात होत्या. त्यामध्ये आता नव्या प्रकाराची भर पडली आहे. गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती करण्याचा प्रयोग केला गेला आहे. येथील गणेश गुंडमी यांनी ही निर्मिती केली आहे.

आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !
गणेशोत्सव मंडळांना दिलासा; पाहा व्हिडीओ

गाईच्या शेणाचा उपयोग करून मूर्ती तयार केली तर ती अधिक पर्यावरणपूरक ठरेल, असा अंदाज बांधून गुंडमी यांनी हा प्रयोग केला. अर्थात सर्वात मोठा प्रश्‍न गाईच्या शेणाच्या मूर्तीचा साचा करण्याचा होता. तेव्हा त्यांनी काही साचे तयार करून घेतले. गाईच्या शेणामध्ये शाडू मातीप्रमाणे वाळल्यावर घट्ट होणे, चिकटपणा हे गुण असत नाहीत. तेव्हा त्यांनी गाईचे शेण वाळवून त्याचे पावडर करून नंतर त्यामध्ये काही वेगळे पदार्थ टाकून ते शाडू मातीप्रमाणे घट्ट केले. त्यामुळे या गोमयाचा उपयोग शाडू मातीप्रमाणे करता येतो आहे. तसेच या प्रक्रियेमुळे गाईच्या शेणाचा वास जाऊन त्यात टाकलेल्या सुगंधी पदार्थामुळे ही मूर्ती देखील सुगंधित झाली आहे. नंतर त्यांनी मूर्ती तयार करण्यास सुरवात केली. तेव्हा अगदी सुरवातीलाच पुणे, ठाणे, बंगळूर आदी शहरांतून मूर्तीची मागणी सुरू झाली. सर्वाधिक मागणी पुण्यातून झाली. ऑगस्ट अखेरीस त्यांच्याकडील दोन हजार मूर्तींची बुकिंग झाली. नंतर दिल्लीच्या राष्ट्रीय कामधेनू आयोग या केंद्र सरकारच्या संस्थेने या निर्मितीची दखल घेत गुंडमी यांच्याशी संपर्क साधला. तसेच या प्रकारची मूर्ती तपासणीसाठी मागवून घेतली आहे.

शाडूची मूर्ती

  • विसर्जनानंतर मूर्तीचा बनतो गाळ

  • पाण्यात विरघळण्यास बराच वेळ

  • विरघळलेले कण केवळ गाळ म्हणून उपयोगी

  • जलचर व माशांसाठी खाद्य बनत नाही

गोमय गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये

  • एका तासात पाण्यात विरघळते

  • विरघळलेल्या मूर्तीचे कण मासे व जलचरासाठी बनते खाद्य

  • मूर्तीत झाडाच्या बिया टाकल्यास विसर्जनानंतर थेट रोपात रूपांतर

  • रोपाला पुरेसे होईल एवढे मिळते खत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com