सोलापूर : ‘एनटीपीसी’ची बालिका सक्षमीकरण मोहीम

परिसरातील चाळीस मुलींना प्रशिक्षण
NTPC Girl Empowerment Campaign Train forty girls solapur
NTPC Girl Empowerment Campaign Train forty girls solapurSAKAL

सोलापूर : येथील एनटीपीसीमध्ये बालिका सक्षमीकरण मोहीम (गर्ल एम्पॉवरमेंट मिशन) सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक (नासाका) श्रीनिवास राव यांच्या हस्ते झाले. या मोहिमेचा मुख्य उद्देश एनटीपीसी प्रकल्पग्रस्त गावातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना बालिका सक्षमीकरण अभियानांतर्गत आधुनिक तंत्राने शिक्षण देणे, त्यांना उत्तम सुविधांची ओळख करून देणे, जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. आजूबाजूच्या गावातील (होटगी, होटगी स्टेशन, औज, तिल्हेहाळ) जिल्हा परिषद शाळांमधील ९ ते १० वयोगटातील ४० मुलींनी या विकास कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात प्रशिक्षित शिक्षकांमार्फत मुलांना गणित, विज्ञान, इंग्रजीसह स्वसंरक्षण, योगा, नृत्यकलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी दोन ते चार गुणवंत मुलींची निवड करून त्यांचे शिक्षण एनटीपीसी सोलापूरमार्फत बारावीपर्यंत घेतले जाईल. मुलींना गणवेश, ट्रॅकसूट, दैनंदिन जीवनातील वस्तूंचे किट, लेखन- वाचन आणि चित्रकला साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये योगा, सहजयोग, स्वसंरक्षण, फूटबॉल, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस, इनडोअर गेम्स, नृत्य, नाटक, संगीत, बालसंसद, वक्तृत्व, संगणक शिक्षण, गणित, विज्ञान, पर्यावरण संरक्षण यांचा समावेश होता.

बालिका सक्षमीकरण मोहिमेच्या उद्‌घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक (नासाका) श्रीनिवास राव, सृजना महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया राव, जी. एम. राजीव अकोटकर, डी. जी. एम. व्यंकटय्या कोटक, एचआर हेड श्रीनिवास कुप्पामूर्ती, जी. एम. दीपकरंजन देहुरी, जी. एम. तपनकुमार बंद्योपाध्याय, जी. एम. बिपुलकुमार मुखोपाध्याय. जी. एम. एरुकुल्ला नंदकिशोर, असिस्टंट कमांडंट आर. के. शर्मा आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com