esakal | "हे' कारण सांगुन तिघांनी केला रुग्णवाहीकेतून प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

Offense for traveling from the ambulance stating that he was ill

पोलिसांनी गाडीत पाहीले असता एक महीला एका पुरषाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता एकही इसम आजारी नसुन ते आजारी असल्याचा बनाव करुन बाबासाहेब शेलार, अनीता शेलार व गौरव शेलार हे प्रवास करीत असल्याचे दिसुन आले. 

"हे' कारण सांगुन तिघांनी केला रुग्णवाहीकेतून प्रवास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळशिरस (सोलापूर) : बारामती येथे आजारी असल्याचा बहाणा करुन प्रवास करणाऱ्यासह रुग्णवाहिकेवर माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राजाराम खंडु जाधव (वय 45 वर्ष, रा बारामती) हा त्याच्याकडील मारुती व्हॅन या रुग्णवाहीकेमधुन तिघांना माळशिरसहुन बारामतीकडे घेऊन जात होता. तेव्हा 58 फाटा माळशिरस येथे पेट्रोलीग करीत असलेल्या पोलिस हेडकॉंस्टेबल गायकवाड डुबल व आतार यांनी रुग्णवाहिका थांबवुन चौकशी केली. तेव्हात रुग्णवाहीकेतुन रुग्ण घेऊन बारामतीला चाललो असल्याचे सांगीतले.

पोलिसांनी गाडीत पाहीले असता एक महीला एका पुरषाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता एकही इसम आजारी नसुन ते आजारी असल्याचा बनाव करुन बाबासाहेब शेलार, अनीता शेलार व गौरव शेलार हे प्रवास करीत असल्याचे दिसुन आले. 
महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणुन जिल्हाधीकारी सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन समीती आदी नियम 2005 कलम 34 भारतीय साथीचे रोग नियंत्रण आदी नियम 1897 तसेच महाराष्ट्र पोलिस अधीनियम कायदा कलम 1951 चे कलम 37 (3) अन्वये आदेश पारीत असताना माळशिरस येथुन रुग्णवाहीकेमधुन माळशिरस येथुन बारामती (जि. पुणे) येथे जिल्हाबंदीचा आदेश असताना सुद्धा आजारी असल्याचा बनाव करुन प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातुन पूणे जिल्ह्यात जाताना जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केल्याने रुग्णवाहिकेचा चालक राजाराम जाधव यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिक्षक नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश गायकवाड, राहुल झुजुंर्डे, अमोल बकाल, सचिन डुबल, इन्नुस आतार, होमगार्ड शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली. 

loading image