
-प्रमोद बोडके
सोलापूर : आमचा झेडपी गट/पंचायत समिती गण पूर्वी अमुक जातीसाठी आरक्षित होता. आता या जातीसाठी आरक्षित होईल, असा अंदाज काढत असाल तर थांबा. यापूर्वीच्या निवडणुकीतील गट/गणाच्या आरक्षणाचा आणि आगामी निवडणुकीतील आरक्षणाचा आता काहीही संबंध राहिला नाही. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरता क्रम या निवडणुकीसाठी केला जाणार आहे.