esakal | Solapur: "राज्य परिवहन कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा"
sakal

बोलून बातमी शोधा

"राज्य परिवहन कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा"

आगामी काळात राज्यव्यापी आक्रमक व निर्णयक लढाई करण्याचा वज्रनिर्धार यावेळी करण्यात आला.

"राज्य परिवहन कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: महाराष्ट्रात दळणवळणाची साधने विकसित करताना प्राधान्याने गाव तिथे एसटी ही संकल्पना घेऊन राज्य परिवहन महामंडळ कार्यरत झाले. एसटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला परवडणाऱ्या दरात, सुरक्षित वाहतूक व सुखकर प्रवासाची सेवा उपलब्ध देण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाची स्थापना केली. हे राज्य परिवहन महाराष्ट्रासह अन्य राज्यातही सेवा दिली जाते. मात्र एस.टी. कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापेक्षा हि कमी वेतनावर काम करावे लागते. म्हणून राज्य परिवहन शासनात विलीनीकरण करून यांना शासकीय कर्मचारीप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा. अशा आशयाचे मत संघर्ष एस.टी. कामगार युनियनच्या सुसंवाद मेळाव्यात राज्यातील आलेले एस.टी.कर्मचारी प्रतिनिधी व नेतेगण व्यक्त केले. त्यासाठी आगामी काळात राज्यव्यापी आक्रमक व निर्णयक लढाई करण्याचा वज्रनिर्धार यावेळी करण्यात आला.

हेही वाचा: सोलापूर : इलेक्‍ट्रिक वाहनांना आता महावितरणची ‘ऊर्जा’

संघर्ष एसटी कामगार युनियनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत सखोल चर्चा करून आगामी काळातील भूमिका निश्‍चित करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुसंवाद मेळावा (ता.02) ऑक्‍टोबर रोजी सिटू कार्यालय दत्त नगर, सोलापूर येथे युवा कामगार नेते शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली व सिटू राज्य उपाध्यक्ष, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला. मेळाव्याची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख, युनियनचे राज्य कार्याध्यक्ष ज. म. कहार, युनियनचे विभागीय सचिव शशिकांत नकाते, सिटू राज्य सचिव कॉ. सलीम मुल्ला, नागनाथ क्षीरसागर उपस्थित होते.

हेही वाचा: सोलापूर : नव्या संसद भवनाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. यावेळी संघर्ष एसटी कामगार युनियनची सोलापूर जिल्हा विभागीय नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष विजय यादव (सोलापूर), उपाध्यक्ष-सचिन माने (करमाळा), अनिल सिरसट (सोलापूर), सचिव-शशिकांत नकाते (कुर्डूवाडी), सहसचिव-अनिल पुजारी (अक्कलकोट), आकाश जाधव (सोलापूर), खजिनदार-चेतन थोरात (सोलापूर), मारुती नेटके (सोलापूर), सल्लागार-हनमंत गिरी (करमाळा), नागनाथ क्षीरसागर (सोलापूर), महिला संघटक-विजया भूमकर (पंढरपूर), संघटक सचिव-असगरअली दर्जी (अक्कलकोट), प्रवीण बारवकर (बार्शी), प्रसिद्धी प्रमुख-ज्ञानेश्वर वाघमारे (कुर्डूवाडी), महेश मुळे (सोलापूर), विभागीय सदस्य-राजू सय्यद (कुर्डूवाडी), आदित्य अडसूळ (बार्शी), बाळासाहेब जाधव (पंढरपूर), केशव मोरे (सोलापूर), हनमंत सातनाक (बार्शी), राजेंद्र म्हेत्रे (मंगळवेढा), सौ. जमदाडे (पंढरपूर) आदी नूतन कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय चिंचोळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक धोत्रे यांनी केले

loading image
go to top