Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी वारीनिमित्त विठुरायाचे २४ तास दर्शन; ३० नोव्हेंबरपर्यंत मंदिर अहोरात्र खुले

आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीलाही असंख्य भाविका वारीसाठी पंढरपूरात दाखल होत असतात. त्या सर्वांना दर्शन मिळावे यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मंदिर अहोरात्र खुले ठेवण्यात येत आहे
Kartiki Ekadashi 2023
Kartiki Ekadashi 2023Esakal

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी यात्रा काळात देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. देवाच्या राजोपचारामुळे भाविकांची दर्शन रांग थांबू नये यासाठी राजोपचारही बंद केले जातात. या प्रथेप्रमाणे काल (गुरुवार) पासून भाविकांना विठुरायाचे २४ तास दर्शन सुरु करण्यात आले. ३० नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे.(Latest Marathi News)

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या वेळी लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाते. भाविकांना तासन्तास रांगेत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन या दोन्ही यात्रांच्या वेळी जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि देवाच्या पाठीशी लोड ठेवला जातो.

Kartiki Ekadashi 2023
Dhangar Reservation: "शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात.."; भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांना करून दिली राजधर्माची आठवण

या प्ररंपरेप्रमाणे काल देवाच्या शेजघरातील पलंग काढून देवाच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आला. मंदिर आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अहोरात्र उघडे ठेवण्यात येणार आहे. या काळात काकडा आरती, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद ठेवण्यात येणार असून या काळात फक्त पहाटे चार ते पाच या वेळात नित्यपूजा, सकाळी पावणे अकरा ते अकरा या वेळात महानैवेद्य आणि रात्री साडे आठ ते नऊ या वेळात गंधाक्षता करण्यात येणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Kartiki Ekadashi 2023
Mumbai Fire News: मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

हा काळ वगळता उर्वरित बावीस तास पंधरा मिनिटाच्या काळात श्रींचे पदस्पर्श दर्शन चालू राहणार असून मुखदर्शन मात्र अखंड २४ तास चालू राहणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीकडून नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.(Latest Maharashtra News)

Kartiki Ekadashi 2023
Balasaheb Thackeray : जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना सोडली होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com