esakal | बुधवारी एका दिवसात आढळले 1878 रुग्ण ! 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona Upadate
बुधवारी एका दिवसात आढळले 1878 रुग्ण ! 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आजवरील सर्वांत जास्त रुग्णांची नोंद बुधवारी (ता. 28) झाली. शहर- जिल्ह्यात एका दिवसात दहा हजार 131 संशयितांमध्ये एक हजार 878 रुग्ण सापडले. तर शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी 19 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सात, बलदवा, गंगामाई, मोणार्क, अश्‍विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी, जीशान, रेल्वे, बॉईज हॉस्पिटलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा तर जोशी हॉस्पिटलमधील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज पुन्हा कोरोनाने तरुणांवरच हल्ला चढवत त्यांचा बळी घेतला आहे.

हेही वाचा: तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान

त्यात म्हाडा कॉलनी (जुळे सोलापूर) येथील 37 वर्षीय पुरुषाचा तर प्रताप नगरातील (विजयपूर रोड) 30 वर्षीय आणि विजयनगर (कुमठा नाका) येथील 40 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये अनगर येथील 32 वर्षीय पुरुषाचा, नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील 36 वर्षीय तर निमगाव (ता. माळशिरस) येथील 34 वर्षीय, बीबी दारफळ येथील 39 वर्षीय आणि मंगळवेढ्यातील दामाजी नगरातील 34 वर्षीय पुरुषाचा तर अंजनगाव उमाटे (ता. माढा) येथील 44 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 34, पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 353, सांगोल्यातील 211, दक्षिण सोलापुरात 29, बार्शीत 135 (1), करमाळ्यात 178 (3), माढ्यात 177 (5), माळशिरसमध्ये 244 (4), मंगळवेढ्यात 133 (2), मोहोळ तालुक्‍यात 98 (2) आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यात 52 (2) रुग्णांची भर पडली आहे. आज एका दिवसात एक हजार 306 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा: 34 कोरोना रुग्णांवर गुन्हा दाखल ! पॉझिटिव्ह असूनही क्वारंटाइन न होता फिरत होते बिनधास्त

जिल्ह्याची कोरोना सद्य:स्थिती...

  • एकूण रुग्णसंख्या : 95,670

  • मृत्यू : 2,668

  • ऍक्‍टिव्ह रुग्ण : 14,593

  • बरे झालेले रुग्ण : 78,409

प्रभाग 19 मध्ये एकही रुग्ण नाही

शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी आज सर्वाधिक रुग्णांची नोंद प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये झाली. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज एकही रुग्ण सापडला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत याच प्रभागाने जनता कर्फ्यू यशस्वी करून दाखविला होता. शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत याच प्रभागात सर्वात कमी रुग्ण व मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिल्यानेच हे यशस्वी झाल्याचे नगसेवकांनी सांगितले.