
-संदीप गायकवाड
उ.सोलापूर: अकोलेकाटीत (ता. उत्तर सोलापूर) २० वर्षांपूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या दारात बैलजोडी होती. काही शेतकऱ्यांकडे तरी दोन-दोन बैलजोड्या होत्या. त्यावेळी १५० च्या आसपास असणारी ही संख्या आता ३१ बैलजोड्यांवर आली आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील बीबी दारफळ, कोंडी, डोणगाव, पाकणी व मोहोळ तालुक्यातील विरवडे गावात दिसून आली.