esakal | गूड न्यूज ! मदरशांना ठाकरे सरकारकडून दिड कोटी 

बोलून बातमी शोधा

madarsa

मदरशांमधील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षण देणे, शाळा, महाविद्यालयांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिखण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल यादृष्टीने मदशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून हा निधी देण्यात आला आहे.

गूड न्यूज ! मदरशांना ठाकरे सरकारकडून दिड कोटी 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह मुंबई उपनगर, बुलढाणा, नांदेड, नगर, उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर येथील 44 मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ठाकरे सरकारने एक कोटी 47 लाख 50 हजारांचा निधी दिला आहे. प्राप्त निधी आगामी तीन महिन्यांत ठरलेल्या कामांवरच खर्च करावा, असे निर्देशही दिले आहेत. 


हेही नक्‍की वाचा : हळूहळू चालवा गाडी ! नववर्षात वाढले अपघात 


मदरशांमधील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षण देणे, शाळा, महाविद्यालयांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिखण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल यादृष्टीने मदशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून हा निधी देण्यात आला आहे. तसेच मदरशांमधील विविध कामे करणे, ग्रंथालयांसह शिक्षकांना अनुदान देणे अशी कामे त्या निधीतून केली जातात. 2019-20 साठी राज्य सरकारने आठ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून दिड कोटी रुपये देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने 18 फेब्रुवारीला घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा निधी संबंधित मदरशांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामध्ये सोलापुरातील पाच, मुंबई उपनगरातील दोन, नगरमधील एक, बुलढाण्यातील सहा, यवतमाळमधील तीन, नांदेडमधील सर्वाधिक 13, उस्मानाबादमधील आठ मदरशांचा समावेश आहे. 


हेही नक्‍की वाचा : किमया निसर्गाची...छबी शिवबाची ! आसमंतात साकारली शिवबाची प्रतिमा 

सरकारच्या सूचना 

  • मंजूर झालेला निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मदरशांच्या खात्यावर वितरीत करावा 
  • ठरलेल्या कामांवरच निधी खर्च करावा : तीन महिन्यात कामे पूर्ण करावीत 
  • मदरशांनी कामे पूर्ण केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना कामांचा अहवाल सादर करावा 
  • जिल्हाधिकाऱ्यांनी मदरशांकडून प्राप्त झालेला अहवाल शासनाला तत्काळ द्यावा