Mohol Accident : शिवाई व टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यु

राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजका वरील झाडांना पाणी घालताना टँकरला शिवाई बसने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
shivai bus and tanker accident
shivai bus and tanker accidentsakal

मोहोळ - राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजका वरील झाडांना पाणी घालताना टँकरला शिवाई बसने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिखली शिवारात सोमवारी सकाळी 10 वाजता झाला. विलास उद्धव क्षीरसागर वय 49 रा यावली ता मोहोळ असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहिती नुसार, पाणी टँकर क्रमांक एम एच 04 डीएस 4693 याद्वारे सोलापूर- पुणे महामार्गाच्या दुभाजकावरील झाडांना हातात पाईप धरून विलास क्षीरसागर हा पाणी देत होता. टँकर मधील पाणी संपल्याने विलास हा टॅंकरच्या पाठी मागील वाल बंद करण्यासाठी गेला होता.

त्यावेळी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या शिवाई बस क्रमांक एम एच 12 व्ही एफ 4032 हिने टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यावेळी टँकरचा बंपर तुटून विलास हा टँकरच्या चाकाखाली अडकला व गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जोरात होती की टँकर दुभाजकावर चढला.

मृत विलास याला उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेची फिर्याद संतोष पांडुरंग दळवे वय 34 रा यावली यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com