Solapur : मोटार सायकल व गॅस टँकरच्या अपघातात स्वामी समर्थ दिंडीतील भाविकांचा मृत्यू

स्वामी समर्थांच्या दिंडीत पायी चालत निघालेल्या एका भाविकाला मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने व तो उडवून गॅस टँकर खाली आल्याने टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
one devotee killed bike and gas tanker accident mohol police
one devotee killed bike and gas tanker accident mohol police Sakal

मोहोळ : स्वामी समर्थांच्या दिंडीत पायी चालत निघालेल्या एका भाविकाला मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने व तो उडवून गॅस टँकर खाली आल्याने टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात शनिवार ता 20 रोजी सकाळी सात वाजता झाला. संकेत श्रावण निकम वय 22 रा सावरगाव ता येवला जिल्हा नाशिक असे मृत भाविकांचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, स्वामी समर्थ महाराजांची दिंडी सोलापूरच्या दिशेने पायी चालली होती. त्याच दिंडीत संकेत निकम हा ही पायी चालला होता. दिंडी यावली शिवारात आली असता पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच 25/ बीबी 62 75 च्या मोटरसायकल स्वराने संकेत यास पाठीमागून जोराची धडक दिली. धडक बसतात संकेत हा रोडवर उडून पडला.

त्याच वेळी गॅस टँकर क्रमांक के ए 01/ ए एन 9779 हा चालला असता त्याच्या खाली संकेत आला. त्यामुळे संकेतच्या कंबर व पायावरून टॅंकरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सोलापूर येथील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरने त्यास तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी रवींद्र नारायण लिंगायत वय 24 रा सावरगाव ता येवला जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मोटरसायकलचा चालक व गॅस टँकर चालक गहिनीनाथ प्रभू पसफुले रा बंदेनवाजवाड़ी ता बसवकल्याण या दोघा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास अपघात पथकाचे हवलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com