मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु एक जखमी

पुण्याहून निलंग्या कडे निघालेल्या मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेच्या रोड रोलरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला
One killed in accident one injured solapur
One killed in accident one injured solapur sakal

मोहोळ : पुण्याहून निलंग्या कडे निघालेल्या मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेच्या रोड रोलरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात गुरुवार ता 12 रोजी सायंकाळी चार वाजता मोहोळ ते सोलापूर महामार्गावरील कोळेगाव शिवारात झाला. तेजस हौसेराव अंधारे वय 29 रा हडपसर असे मृताचे नाव आहे ,तर विशाल मधुकर माने वय 19 रा औराद असे जखमीचे नाव आहे. जखमीला अधिक उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत तेजस अंधारे व जखमी विशाल माने हे पुणे येथील एका कंपनीत नोकरी करतात. गुरुवारी ते दोघे मोटरसायकल नंबर एम एच 12 टी एफ 0971 वरून पुण्याहून निलंग्या कडे निघाले होते. त्यांची मोटरसायकल मोहोळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळीगाव शिवारात आली असता, त्या ठिकाणी असलेल्या रोड रोलर ला त्यांनी पाठीमागून जोराची धडक दिली त्यात गंभीर जखमी होऊन तेजस हा जागीच मरण पावला, तर विशाल हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार जे एन पवार हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com