विद्यापीठात पार पडला ऑनलाइन दीक्षांत सोहळा ! जीवनगौरव पुरस्कार बार्शीतील डॉ. बबन यादव यांना प्रदान

IMG-20210222-WA0244 (3).jpg
IMG-20210222-WA0244 (3).jpg

सोलापूर : पदवीधर तरुणांनी निश्‍चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्‍त केली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत सोहळा सोमवारी (ता. 22) ऑनलाइन पार पडला. यावेळी राजभवनातून राज्यपाल कोश्‍यारी यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा हे उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान

  • जीवनगौरव पुरस्कार : डॉ. बबन यादव (बार्शी)
  • उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार: शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज
  • उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: के. एन. भिसे, आर्टस, कॉमर्स ऍण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी
  • उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य, डॉ. बब्रुवाहन पांडूरंग रोंगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर
  • उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: डॉ. विष्णू पांडूरंग शिखरे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी
  • उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: कैलास वसंतराव देशमुख, प्रबंधक, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा

 
राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी स्वावलंबनाचा विचार दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भरतेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी नवसंशोधनाला प्राधान्य द्यावे. कोरोनाने जगाला वेढले असून अशा परिस्थितीमध्ये देशाने लस निर्मितीत पुढाकार घेतला, ही अतिशय उत्तम बाब आहे. भगवान श्रीराम आणि गौतम बुद्धांच्या या देशात आपण त्यांचा आदर्श आजही घेतो, त्याचे कारण त्यांचा सदाचार हे आहे. कोणतीही गोष्ट परिश्रमाशिवाय साध्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात तरुणांनी निराश न होता समर्थ रामदासांनी सांगितलेला सदाचाराचा वसा घेऊन पुढे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्यापीठाने कोरोनाला दूर ठेवण्यास फोर इन वन उपकरण विकसित केले, मास्क निर्मितीही केली, त्याचे कौतूकही त्यांनी केले. आमदार सुभाष देशमुख म्हणाले, स्थलांतर रोखण्यासाठी विद्यापीठाने रोजगार निर्मितीवर भर द्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार श्रेणीक शाह यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com