ऑनलाइन गेम तरुणांना बनवतोय व्यसनाधीन

शॉर्टकट पैसे कमाविण्याच्या नादात जातोय अनेकांचा बळी
child attraction mobile game
child attraction mobile gamesakal media

अक्कलकोट - हल्ली इंटरनेट, ऑनलाइनचा जमाना. सध्या लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाइल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, याच्‍या अतिरिक्त वापराने तरुणाई बिघडत चाचली आहे. अशातच भर पडली ती, ऑनलाईन गेमची. शॉर्टकट पैसे कमाविण्याच्या नादात अक्षरशः तरुणांचा बळी जातोय, हे त्‍यांच्‍या लवकर लक्षात देखील येत नाही.

काही तरुण मुले पैसे कमविण्याच्या शॉर्टकट मार्ग म्हणून मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळतात. त्यातून हजारो तरुण याच्या आकर्षणाचे शिकार बनत असून, त्यांना आर्थिक लाभ होण्याचे तर दूरच पण ती मुले घरातील आर्थिक गणिते सुद्धा बिघडवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांना नैराश्य, आर्थिक अडचणी, शिक्षणात व कुटुंबाच्या कामात वेळ देता न येणे, निद्रानाश आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ॲपच्या माध्यमातून अनेक जीवघेण्या ऑनलाइन गेम्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत.

रम्मीसारखे गेम्स सुरुवातीला कुतूहल म्हणून खेळायला सुरु करणारे तरुण हळूहळू त्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. तहानभूक, काम सर्वकाही विसरून दिवसरात्र पैसे लाऊन ऑनलाईन खेळ खेळणे, यातच रममाण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी, व्यसनाधीन, निद्रानाशाचा तरुणाईला फटका बसत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमच्या माध्यमातून 'काही तासातच लाखो रुपये कमवा करोडपती व्हा' अशी आमिषे दाखविणाऱ्या जाहिरात[ दिवसभरात सतत पाहायला मिळत आहेत. तरुणाई याकडे ओढली जात असून, कर्जबाजारी होत असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्वच गोष्टींचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही विपरीत परिणाम झालेला पहायला मिळत आहे.

काही कर्जबाजारी तर काही यातील नैराश्यामुळे व्यसनाधीन झाले आहेत, तर काहींची झोप उडून त्यांना निद्रानाश जडला आहे. आजकालची काही तरुणाई कष्ट न करता ऑनलाइन गेमच्या माध्यमातून कसे आपण एका दिवसातच लखपती बनू या विचारात असतात. त्यातच आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. तरुणाई तर मोबाइल हाताळण्यात तरबेज आहे. दिवस रात्र मोबाइलच्या सानिध्यात घालवणाऱ्यांना आता ऑनलाइन गेमच्या माध्यमातून गुंतण्यात तरुणाईचे प्रमाण अधिकच आहे.

त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत जागून मोबाईल गेम खेळणे तसेच पैसे हरल्यामुळे झोप उडणे अशा मानसिक नैराश्यातून मद्यपानाकडेही ओढा वाढला आहे. एकंदरीतच हे ऑनलाइन पैसे मिळवून देण्याचा दावा करणारे गेम तरुणाईसाठी घातक ठरत आहेत, हे मात्र नक्की आहे. अशा या ऑनलाइन गेमच्या घातक खेळापासून तरुणाईला रोखण्यासाठी सामाजिक संस्थानी मार्गदर्शनपर शिबिरे राबविण्याची गरज आहे. त्यातून त्यांचे प्रबोधन करून चांगल्या, वाईट गोष्टींची वेळीच त्यांना जाणीव करून देणे आवश्यक बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com