

Digital 7/12 Extract Now Available at Home for ₹15
Sakal
सोलापूर : राज्य सरकारने आता डिजिटल सातबारा उताऱ्याला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामु ळे जमिनीच्या व्यवहारासाठी सरकारी कामांसाठी लागणारा सातबारा केवळ १५ रुपयांत ऑनलाइन उपलब्ध आहे. ती मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून घरबसल्या मोबाईलवर पाच मिनिटांत कायदेशीररीत्या मान्य असलेला डिजिटल सातबारा मिळवता येईल.