गणेशोत्सवाची ठरली नियमावली! पुजेसाठी 50 जणांनाच परवानगी

 satpute-
satpute-
Updated on
Summary

पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेचीही शक्‍यता वर्तविली जात आहे.

सोलापूर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आहेत, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले. पुजेसाठी 50 व्यक्‍तींनाच परवानगी असणार आहे. त्यांनी पुजेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

 satpute-
अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सात रस्ता येथील नियोजन भवनात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

 satpute-
महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना होणाऱ्या बाप्पाची मुर्ती चार फुटापर्यंत तर घरगुती बाप्पांची मुर्ती दोन फुटाची असावी. गणेशाच्या पुजेसाठी 50 व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अनावश्‍यक खर्च टाळून मंडळांनी कोरोनाविषयक जनजागृतीवर भर द्यावा. रक्‍तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर, सीईओ स्वामी यांनीही मार्गदर्शन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर करवाई केली जाणार आहे.

 satpute-
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्‍सप्रेस दुसऱ्यांदा रद्द

जिल्हाधिकारी म्हणाले...

- कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट चिंताजनक होती; तिसऱ्या लाटेपूर्वी सर्वांनी खबरदारी घ्यावी

- पहिल्या लाटेत एका दिवसात एक हजार तर दुसऱ्या लाटेत 2300 रुग्ण आढळले; गर्दी अन्‌ कोरोनाचे वैर आहे

- कोरोना वाढल्याने लॉकडाउन, व्यापार, व्यवसाय बंद करावा लागला; जिवितहानीही झाली आता तरी सर्वांनी काळजी घ्यावी

- गणेशोत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा; सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा

- जिल्ह्यातील गरजूंना मंडळांनी मदत करावी; गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com