

Only E-KYC verified beneficiaries will get benefits under Ladki Bahin Yojana; complete verification by November 18.
Sakal
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस ई-केवायसी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर आहे, त्यांचा लाभ बंद होणार आहे. लाभार्थींना ई-केवायसी करून घेण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींना मंगळवारी (ता. ४) ऑक्टोबरचा लाभ जमा झाला आहे.