esakal | Navratra Festival : देवीच्या मंडपात एकावेळी फक्त पाच जणांना परवानगी!
sakal

बोलून बातमी शोधा

देवीच्या मंडपात एकावेळी फक्त पाच जणांना परवानगी! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या.

देवी मंडपात फक्त पाच जणांना परवानगी! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : यावर्षी 7 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा / दसरा (Navratri Festival) साजरा होणार आहे. या कालावधीत आरती, भजन, कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी केल्या आहेत.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात रूपाभवानी मंदिरात 'असे' होणार धार्मिक कार्यक्रम

ही आहे नियमावली

नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून त्या पद्धतीने मूर्तीची सजावट करावी. मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता चार फूट तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फूट असावी. शक्‍यतो मागील वर्षी प्रमाणे देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे. घरी शक्‍य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यासदर्भांत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

मंडळांनी आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. माझे कुटुंब - माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान शिबिरे यांना प्राधान्य द्यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक आदींद्वारे जास्तीत जास्त व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

loading image
go to top