सोलापूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांमध्ये घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांमध्ये घट

मागील दोन वर्षांमध्ये सोलापूर रेल्वे विभागात गुन्हेगारी मध्ये वाढ झाली होती. मात्र यंदाच्या चालू वर्षात याचे प्रमाण कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

सोलापूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांमध्ये घट

सोलापूर : मागील दोन वर्षांपासून सोलापूर रेल्वे विभागात वाढलेल्या गुन्हेगारीला रेल्वे पोलिसांकडून आळा घालण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागातील गेल्या दोन वर्षात गुन्ह्यांमध्ये घट झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (the solapur railway division has seen a decline in crime in the last two years)

मागील दोन वर्षांमध्ये सोलापूर रेल्वे विभागात गुन्हेगारी मध्ये वाढ झाली होती. मात्र यंदाच्या चालू वर्षात याचे प्रमाण कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यात चोरी, लुटमार, मोबाईल हिसकावून नेणे, हाणामारीच्या घटना त्याचबरोबर रेल्वेच्या मालमत्तांची चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सर्वसामान्यांमधून भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात दहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी यांची नियुक्ती असली तरी देखील सन 2019 मध्ये 6 हजार 667 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर सन 2020 मध्ये 2 हजार 230 तर सन 2021 च्या पाच महिन्यांत 1 हजार 11 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या सव्वा वर्षाच्या कालावधीत आधीच्या तुलनेत रेल्वे गुन्ह्यांमध्ये प्रचंड घट झाल्याचे आकडेवारीवरून पुढे आले. रेल्वे प्रवासी गाड्या व प्रवाशांच्या जेमतेम संख्येमुळे दिलासादायक चित्र आहे. सध्यातरी गाड्या कमी प्रमाणात धावत असल्याने गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या सव्वा वर्षाच्या कालावधीत आधीच्या तुलनेत सोलापूर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत गुन्ह्यात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रसार वाढीस लागल्याने एकाच रात्रीतून रेल्वे प्रवासी गाड्यांची चाके थांबलीत. तब्बल सहा महिन्यांनी संसर्ग कमी झाल्यानंतर काही रेल्वे गाड्या पूर्ववत केल्या गेल्या. मात्र, भीतीपोटी प्रवाशांची संख्या रोडावली होती. रेल्वे स्थानकावर आरपीएफ, जीआरपी, रेल्वे प्रशासनाची करडी नजर असल्याने रेल्वेच्या गुन्हेगारांवर मोठा अंकुश बसला आहे. त्याचप्रमाणे 2021 च्या चालू वर्षाच्या पाच महिन्यात एकूण 1 हजार 11 गुन्हे दाखल झाले. यात गंभीर गुन्हे देखील आहेत. जेमतेम असणाऱ्या रेल्वे गाड्या व प्रवाशांची संख्या यामुळे रेल्वेच्या गुन्ह्यात मोठी घट झाली. यापुढेही रेल्वे विभागाच्या हद्दीत गुन्हेगारांचा शिरकाव होणार नाही, याकडे यंत्रणेने लक्ष दिल्यास प्रवासी वर्गासाठी ती मोठी दिलासादायक बाब ठरेल.

विभागात हे गुन्हे घडतात

मोबाईल चोरी, बॅग पळविणे, पाकीट चोरी सोनसाखळी चोरी, हाणामारी आदी गुन्हे रेल्वे स्थानकावर होत असतात. त्याचबरोबर सोलापूर रेल्वे विभागात रेल्वेची मालमत्ता विविध ठिकाणी असल्याने या ठिकाणी येथील चोरीचे प्रमाण असल्याने यांच्यावर देखील पोलिसांची करडी नजर असल्याने येथील ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशी आहे गुन्ह्यांची आकडेवारी

वर्ष स्थानकावरील व प्रवासादरम्यान मालमत्ता

2019 6 हजार 649 18

2020 2 हजार 210 20

2021 995 16

कोरोना संसर्गामुळे रेल्वे गाड्यांची तसेच प्रवाशांची संख्या कमी आहे. गुन्हेगारांवर आरपीएफ आणि जीआरपी यांची करडी नजर आहे. गुन्हेगारीचा घटलेला आलेख यापुढेही कायम राहील.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

(the solapur railway division has seen a decline in crime in the last two years)

टॅग्स :Solapurdecline in crime