
सोलापूर : येथील शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीची यात्रेनिमित्त शेकडो महिलांनी कुंकुमार्चन कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरप्रीत्यर्थ सीमेवरील जवानांना सिंदूर पाठवण्यासाठी संकलित करण्यात आला. त्यासोबत जवानांना `आम्ही माता भगिनी तुमच्या पाठीशी आहोत’, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.