esakal | 'युगांडा-सोलापूरचे नाते होईल अधिक वृद्धिंगत!' आफ्रिकेमार्फत सोलापूर गारमेंटला निर्यातीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

'युगांडा-सोलापूरचे नाते होईल अधिक वृद्धिंगत!'

'आफ्रिकन ग्रोथ अपॉर्च्युनिटी अ‍ॅक्‍ट' (ओगवा)च्या माध्यमातून सोलापूरच्या गारमेंट उत्पादकांनी युरोपला निर्यातीची सुवर्णसंधी शोधली आहे.

Solapur : 'युगांडा-सोलापूरचे नाते होईल अधिक वृद्धिंगत!'

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : युगांडा (Uganda) आणि सोलापूरचे (Solapur) निर्माण झालेले नाते पुढील काळात अधिक विकसित होईल. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार आमच्या देशात काही नवे उद्योग (Industry) निर्माण केले जातील, अशी अपेक्षा युगांडाच्या खासदार कॅटूहैर्वे जॅकलिन (Catuharvey Jacqueline) यांनी व्यक्त केले.

'आफ्रिकन ग्रोथ अपॉर्च्युनिटी अ‍ॅक्‍ट' (African Growth Opportunity Act) (ओगवा)च्या माध्यमातून सोलापूरच्या गारमेंट (Solapur Garment) उत्पादकांनी युरोपला निर्यातीची सुवर्णसंधी शोधली आहे. त्यावर रविवारी एक बैठक झाली. होटगी रस्त्यावरील हॉटेल बालाजी सरोवर येथे झालेल्या बैठकीसाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. युगांडाच्या खासदार कॅटूहेवे जॅकलिन यांचे महास्वामींनी स्वागत केले. युगांडा दूतावासाच्या सचिवा सोफी बिरुंगी, उद्योजक मुकिबी नासीर, ल्युमबाझी जेम्स, किझा लुकास, बसोगा चार्ल्स, ओसामा नितांबी, नसोंगंबी सौल यांचे हे शिष्टमंडळ होते.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या कुटुंबाला 50 हजार! राज्यासाठी लागतील 7 हजार कोटी

युगांडाच्या प्रतिनिधींनी भारतातील वस्त्रोद्योगाचे प्रकार व त्याची निर्यात, याच्या पाहणीसाठी त्यांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील 14 शहरांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातून केवळ सोलापूरचा समावेश आहे. युगांडाच्या खासदारांसमवेत एक शिष्टमंडळ सोलापूरला आले होते. या शिष्टमंडळाने येथील उद्योजकांशी हातमिळवणी करणे आवडेल. कारण इथली उत्पादने भुरळ घालणारी आहेत, अशा शब्दांत त्यांनी सोलापूरच्या उद्योगाचा गौरव केला.

खासदार कॅटूहैर्वे जॅकलिन पुढे म्हणाल्या, सोलापूरच्या हातमाग उद्योगामध्ये अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. विशेष म्हणजे, त्यामध्ये महिलाही काम करतात आणि त्या महिलांना घरीच काम करण्याची सुविधा आहे. त्यामुळे या प्रकारचे उद्योग सोलापूरच्या सहकार्याने युगांडात सुरू करता येतील. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न व्हावेत, यासाठी युगांडाचे सरकार कटिबद्ध आहे. सोलापूर आणि युगांडाच्या परस्पर सहकार्यातून हातमाग, हस्तकला, वस्त्रकला, गणवेश अशा प्रकारच्या क्षेत्रातील निर्मितीच्या संधींची देवाण-घेवाण करता येईल.

आफ्रिका खंडातील देशांच्या विकासासाठी 'ओगवा' हा कायदा युनोत संमत झाला. अमेरिकेसह युरोपीय देशांनी याबाबत करार केले. अर्थातच आफ्रिकेतून निर्यात होणाऱ्या मालावर आयात शुल्क असणार नाही. इतर देशांना मात्र 25 टक्के आयात शुल्क भरावे लागेल. आफ्रिका खंडातील युगांडा विकसनशील देश. ओगवाच्या माध्यमातून उद्योजकीय संधी शोधण्यासाठी त्यांचे एक शिष्टमंडळ 24 सप्टेंबरला भारतात आले. दिल्ली, अहमदाबाद येथील उद्योग घटकांना भेटी दिल्या. महाराष्ट्राच्या उद्योग भेटीत फक्त सोलापूरची निवड केली.

सोलापूरच्या असोसिएटेड गारमेंट क्‍लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र रच्चा, सचिव बालाजी शालगर यांनी त्यांचे स्वागत केले. अमित जैन यांनी सोलापूरच्या उत्पादनांचे सादरीकरण केले. त्यांची माहिती दिली.

हेही वाचा: 'माझी मुलगी कलेक्‍टर होणारच!' वडिलांचे स्वप्न केले साकार

... तर वस्त्रोद्योग वाढीस मिळेल संजीवनी

मागील काही वर्षांपासून सोलापुरातील वस्त्रोद्योगातील उद्योजकांनी केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे युगांडाच्या प्रतिनिधींनी सोलापूरची या भेटीसाठी निवड झाली आहे. या भेटीदरम्यान असोसिएटेड गारमेंट क्‍लस्टर फाउंडेशन, सोलापूरतर्फे त्यांना सोलापुरातील गारमेंट व हॅंडलूमच्या कारखान्यांना भेट देण्यात आली. त्यात सोलापुरात बनणारे विविध गारमेंट व हातमागाची उत्पादने त्यांना दाखवण्यात आली. त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चासत्रात भारत व युगांडा यांच्यातील मैत्री व या मैत्रीद्वारे भारतातील वस्त्रोद्योगासंबंधी देवाण-घेवाण याची संपूर्ण माहिती व सादरीकरण करण्यात आले. युगांडा या देशाचे अमेरिका व युरोपसोबत करार आहेत. ज्यामध्ये अमेरिका व युरोप हे देश एखादे उत्पादन युगांडाकडून खरेदी करत असेल तर त्यांना आयात कर लागत नाही व भारताने आपली उत्पादने जर अमेरिका व युरोप या देशात पाठविल्यास 25 टक्के आयात कर भरावा लागतो. जर भारत व युगांडा यांच्यात काही करार झाल्यास युगांडा येथून भारत युरोप व अमेरिका या देशांमध्ये आपली उत्पादने सहज निर्यात करू शकेल. या प्रकारचा काही करार झाल्यास सोलापुरातील वस्त्रोद्योग वाढीसाठी एक संजीवनी मिळेल.

loading image
go to top