Pandharpur News : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध; विश्वासात न घेता उमेदवारी, आमदार अभिजीत पाटील यांचा आक्षेप

सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.
vasantrao deshmukh and rajendra raut

vasantrao deshmukh and rajendra raut

sakal

Updated on

पंढरपूर - सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या समोर आव्हान उभे केले असले तरी वसंतराव देशमुख यांना पक्षातूनच विरोध सुरु झाला आहे. मला विश्वासात न घेता वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीशी माझा काहीही संबंध नाही असे थेट विधान आमदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांच्या या विधानामुळे मतदानपूर्वीच शरदचंद्र पवार पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com