
सोलापूर: महसूल प्रशासन व जलसंपदा विभागात समन्वय न झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने शेतीसह जनावरे, जमिनीचे मोठे नुकसान झाले असून आज मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यात शेतीचे विदारक चित्र आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अधिकाऱ्यांना दिवाळी करू देणार नसल्याचा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.