esakal | आता कारची चोरी होणारच नाही! "ऑर्किड'ने शोधली भन्नाट सिस्टीम
sakal

बोलून बातमी शोधा

आता कारची चोरी होणारच नाही! 'ऑर्किड'ने शोधली भन्नाट सिस्टीम

रस्त्यालगत अथवा हॉटेल, घरासमोरून दुचाकी, चारचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या शहरांमध्ये वाढले आहे. चोरट्याला शोधताना पोलिसांना तारेवरील कसरत करावी लागते. परंतु, आता चिंता करण्याची काही आवश्‍यकता नाही.

आता कारची चोरी होणारच नाही! 'ऑर्किड'ने शोधली भन्नाट सिस्टीम

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रस्त्यालगत अथवा हॉटेल, घरासमोरून दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीचे (Theft) प्रमाण मोठ्या शहरांमध्ये वाढले आहे. चोरट्याला शोधताना पोलिसांना (Police) तारेवरील कसरत करावी लागते. परंतु, आता चिंता करण्याची काही आवश्‍यकता नाही. सोलापुरातील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Orchid College of Engineering) विद्यार्थ्यांनी 'स्मार्ट इग्निशन व ट्रॅकिंग' (Smart ignition and tracking) सिस्टीम विकसित केली असून, या सिस्टीममुळे चोरट्याला कार चोरी करताच येणार नाही. उलट त्या चोराचा फोटो कार मालकाच्या मोबाईलवर (Mobile) लगेच पोचतो व कार मालकाला कार चोरी होण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा मिळतो.

हेही वाचा: मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट

नव्या सिस्टीमनुसार एक स्मार्ट कॅमेरा वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये बसवण्यात आला आहे. तो कॅमेरा रास्पबेरीपाय या इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोलरशी जोडला आहे. सुरवातीला या प्रणालीत कार मालकाची प्रतिमा घेतल्या जातात. त्या प्रतिमा डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवल्या जातात. प्रत्येकवेळी मालक कार चालू करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा डॅशबोर्डवरील कॅमेऱ्यात चालकाची (मालक) प्रतिमा घेतली जाते. त्या वेळी घेतलेली प्रतिमा आणि डेटाबेसमधील मूळ प्रतिमा जुळवून पाहिल्या जातात. दोन्ही प्रतिमा जुळल्या तर रास्पबेरीपाय हे कारच्या इग्निशन सिस्टीमला कार चालू करण्याची आज्ञा देते. याउलट जेव्हा कोणी त्रयस्थ व्यक्ती कार चालू करण्याचा प्रयत्न करते, त्या वेळी पुन्हा डॅशबोर्डवरील कॅमेऱ्याद्वारे त्रयस्थ व्यक्तीची प्रतिमा पडताळली जाते. दोन्ही प्रतिमा न जुळल्यास रास्पबेरीपाय हे इलेक्‍ट्रॉनिक प्रोसेसर कारच्या इग्निशन सिस्टीमला कोणतीच आज्ञा देत नाही. त्यामुळे कार तर चालू होतच नाही; परंतु रास्पबेरीपाय हे इलेक्‍ट्रॉनिक प्रोसेसर कार मालकाच्या मोबाईलवर संबंधित व्यक्‍तीचा फोटो काही वेळातच पाठवतो. त्यामुळे कार चोरी करणारी व्यक्‍ती कोण आहे, याचा शोध घेणे कठीण जात नाही, असा या सिस्टीमचा वेगळेपणा आहे.

हेही वाचा: 36 तासांच्या बॅटरीसह बोल्ट ऑडिओ इयरबड्‌स लॉंच !

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर

या प्रोजेक्‍टमध्ये GPS ची सुविधा देण्यात आली आहे; जेणेकरून कार सध्या कुठे आहे, याचा वेळोवेळी मेसेजदेखील मालकाला मिळतो. आटिफिशिअल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग या तंत्रज्ञाचा वापर करून ही सिस्टीम विकसित केली आहे. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाशी संलग्नित असून, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये काही दिवस इंटर्नशिप करावी लागते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना प्लेसमेंटवेळी होतो. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अस्मिता वामने, दिव्या चिप्पा या सध्या एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करीत आहेत. त्यांनी प्रा. अख्तर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिस्टीम विकसित केली असून, त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी कौतुक केले.

loading image
go to top