मतदार यादीत नाव न आल्यास कार्यकारी संचालक जबाबदार,साखर संचालकाचे आदेश

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता सभासदांची प्रारुप यादी प्रसिद्ध
Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory
Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory sakal

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत करिता मतदार यादीत नाव न आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी संचालकावर राहील अशा आदेशाचे पत्र जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी पत्रान्वये दामाजी चे कार्यकारी संचालकांना दिला.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता नुकतीच 28 हजार 152 सभासदांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली या यादीमध्ये बहुतांश नावे कमी केल्याप्रकरणी वगळलेल्या सभासद आतून नाराजी व्यक्त केली जात होती त्यामध्ये त्या प्रारुप यादी मध्ये मयत सभासदांच्या ठिकाणी वारस करूनही नाव न येणे,सभासदाकडे थकबाकी असणे व शेअर्सची रक्कम पूर्ण न करणे आदी कारणावरून 2437 पेक्षा सभासदांना वगळण्यात आले व 2501 सभासदांचा समावेश यामध्ये नव्याने करण्यात आला.

यात अल्पवयीनचा समावेश केला.जिवंत सभासदांना मयत दाखवले.नवीन सभासदांना कोणत्या बैठकीत व कधी घेतले.या कारणावरून हरकती दाखल करण्याची ता. 29 एप्रिल होती यामध्ये जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत सर्वाधिक हरकती ह्या दामाजी सहकारी साखर कारखान्याने विरोधात आल्या. त्याबाबतची सुनावणी साखर सहसंचालक यांच्या समोर सुरू झाली विद्यमान संचालक बबनराव आवताडे अड नंदकुमार पवार दौलत माने पी बी आदीसह एक हजारपेक्षा अधिक हरकती आल्या. 5 मे रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी 4 मे रोजी साखर संचालकाने आय नमुन्यातील रजिस्टर,जे नमुन्यातील रजिस्टर सादर करण्यावर सूचित केले. परंतु तेही रजिस्टर कारखान्याकडून सादर करण्यात आले नाही.

नवीन सभासद कोणत्या नियमान्वये कोणत्या बैठकीत वाढवण्यात आले व कमी केलेल्या सभासदांना कोणत्या कारणास्तव कमी केले आदी कारणावरून याबाबत विचारणा करण्यात आली,कागदपत्रे उपलब्ध केली नाहीत. त्यावर सभासदांना कारखान्याकडून माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या परंतु सभासदांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली नाही परिणामी त्यांनी सुनावणीच्या वेळी त्यांना त्यांची बाजू मांडण्या मध्ये अडचणी आल्या.त्यामुळे प्रादेशिक साखर संचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी कार्यकारी संचालक यांना आवश्यक कागदपत्रे देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या याबाबतची तक्रार माजी अध्यक्ष अॅड नंदकुमार पवार यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे केली होती त्यामुळे निवडणूक जाहीर होण्या आधीच दामाजी चा आखाडा तापू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com