Osmanabad : जनावरांची तपासणी अन्‌ लसीकरणाने होणार वसुबारस

सीईओ दिलीप स्वामी : झेडपीची विशेष उपाययोजना
cow (lampi viral)
cow (lampi viral)esakal
Updated on

सोलापूर : वसुबारसच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावरांची तपासणी व लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर लम्पी आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. लम्पीमुक्त सोलापूर जिल्हा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

cow (lampi viral)
Osmanabad : ‘मानसोपचारांच्या चळवळीची समाजाला गरज’

जिल्ह्यात जनावरांना लम्पीची लागण झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वेगाने तपासणी व लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सध्या जिल्ह्यातील ४७४ हून अधिक जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. लम्पीमुळे ज्या जनावारांचा मृत्यू झाला आहे. त्या जनावरांच्या मालकांना शासनातर्फे आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ३१ जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मदतीपोटी आठ लाख १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍यातील ५, सांगोला ५, करमाळा ९, माळशिरस ८, पंढरपूर ३, माढा १ अशा प्रत्येकी एक पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

cow (lampi viral)
Osmanabad : उस्मानाबादला पावसाने झोडपले

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून जिल्ह्याबाहेरील जनावरे या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर संपर्क अधिकारी नेमण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. कारखाना परिसरात नव्याने दाखल होणाऱ्या बैल व गाय वर्गीय जनावरांची माहिती तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com