"मूर्ती आमची किंमत तुमची'! "ही' संस्था आलेली रक्कम वापरणार पर्यावरण रक्षणासाठी

Ganapati
Ganapati
Updated on

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "देव बाजारचा भाजीपाला नाही रे...' असे संत तुकडोजी महाराजांनी म्हटले असले, तरी अनेकजण मूर्ती विकत घेताना मात्र भाजीपाल्यासम त्याची किंमत करतात. याला फाटा देत येथील आधार प्रतिष्ठानने "मूर्ती आमची किंमत तुमची' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

शनिवार (ता. 22) पासून गणेशोत्सवास सुरवात होत आहे. त्यानिमित्त घरोघरी गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. सध्या बाप्पांच्या मूर्तींनी दुकाने सजली आहेत. आपली मनपसंद गणेशमूर्ती घेण्यासाठी गणेशभक्तांकडून सध्या बाजारात गर्दी होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेण्यावर अनेकांचा भर आहे. ज्या गणेशाचे आपण दहा दिवस मनोभावे पूजन करतो, त्याची विसर्जनानंतर विटंबना होऊ नये यासाठी अशा गणेशमूर्ती घेण्याकडे कल आहे. परंतु बऱ्याच वेळा पर्यावरणपूरक मूर्तींची किंमत अधिक असल्याने अनेकजण स्वस्तात मिळेल ती मूर्ती घेण्यातही धन्यता मानतात. अशा गणेशभक्तांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी येथील आधार प्रतिष्ठानने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या प्रतिष्ठानने पर्यावरणपूरक मूर्तीचेच प्रत्येक घराघरात आगमन व्हावे यासाठी "मूर्ती आमची किंमत तुमची' असा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे मूर्ती विकत घेताना दुकानदार व ग्राहक असा संबंध संपून देव अन्‌ भक्त असा संबंध तयार होतो. "देव घ्या कुणी देव घ्या । आयता आला घर पुसोनी ।।' या संतवचनानुसार गणेशभक्तांना ही विशेष पर्वणी आधार प्रतिष्ठानने दिली आहे. 

या उपक्रमाबद्दल आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद माईनकर म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून आम्ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मूर्तीची विटंबना थांबावी म्हणून हा उपक्रम राबवितो. पहिल्या वर्षी 25, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 51, चौथ्या वर्षी 100 तर गेल्या वर्षी 151 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती गणेश भक्तांनी नेल्या. येथे मूर्तीची किंमत सांगितली जात नाही तर भक्त स्वेच्छेने डब्यात रक्कम अर्पण करून मूर्ती घेऊन जातात. यंदा कोरोनामुळे 75 मूर्तीच ठेवल्या आहेत. या मूर्ती सोलापुरातील मूर्तिकारांकडून तयार करून घेतो. आठ इंच ते एक फूट उंचीच्या या मूर्ती विविध आकारातील व रंगातील असतात. हा उपक्रम निरंजन पाटील, कपिल बायस, ऐश्‍वर्या कुलकर्णी, सायली मंत्री व अमोल जाधव यांच्या सहाय्याने सुरू आहे. गणेशभक्तांकडून जमा झालेल्या रकमेत काही रक्कम आम्ही जमा करून ती रक्कम पुढील वर्षीच्या मूर्ती खरेदीसाठी व पर्यारण रक्षण उपक्रमासाठी वापरतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com