

Deputy CM Eknath Shinde
Sakal
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरील आहेत. लोकसभेला आणि विधानसभेला महायुती म्हणून आम्ही एकत्र होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना असतात. येथे आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे मित्राचे शत्रू झालो असे नाही. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच आहे आणि तोच राहणार आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.