एप्रिलमध्ये तासाला एक, तीस दिवसांत 740 मृत्यू ! 36 हजार 236 नवे कोरोनाबाधित

सोलापूर शहर व जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला
Corona
CoronaMedia Gallery

सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक एप्रिल 2021 मध्ये दिसला आहे. एप्रिल या एका महिन्यातच तब्बल 36 हजार 236 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. दिवसाला सरासरी 1207 नवीन रुग्ण आढळले आहेत तर एप्रिलच्या या तीस दिवसांमध्ये 740 जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या तीस दिवसांमध्ये झालेल्या 740 मृत्यूमुळे संपूर्ण महिनाभरात एका तासाला सरासरी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Outbreaks of corona were reported in April in Solapur city and district)

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 12 एप्रिल 2020 रोजी आढळला. सप्टेंबर, ऑक्‍टोबरपर्यंत कोरोनाचा उद्रेक कायम होता. त्यानंतर जानेवारीपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत आला. 2021 या वर्षात पुन्हा जानेवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आता झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या चिंतेचे मोठे कारण ठरत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील बेडची क्षमता संपली आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना बेड, रेमडेसिव्हीर, ऑक्‍सिजन या सुविधा मिळविण्यासाठी पदोपदी संघर्ष करावा लागत आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाही कोरोनाचा उद्रेक अधिक गतीने होत असल्याचे समोर येऊ लागल्याने, हा महिना देखील सोलापूरकरांसाठी मोठा कठीण जाण्याची शक्‍यता आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोनाचा रिकव्हरी रेट सध्या 85.11 टक्के, ग्रामीण व नागरी भागातील 78.51 टक्के एवढा आहे. जिल्ह्याचा एकूण कोरोना मुक्तीचा दर हा 80.13 टक्के एवढा आहे.

Corona
जिल्ह्यातील 1674 रुग्णांची कोरोनावर मात ! नव्याने वाढले 2009 रुग्ण

आकडे बोलतात...

महिना चाचण्या बाधित मृत्यू

जानेवारी : 72101 2541 64

फेब्रुवारी : 49746 2023 42

मार्च : 119368 8761 113

एप्रिल : 285203 36236 740

2 मे पर्यंत : 24439 4111 87

Corona
"उजनी'च्या मूळ पाणी वाटपात हस्तक्षेप नाही ! खडकवासला धरण विभागाचे स्पष्टीकरण

सोलापूरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या महिन्यात कोरोनाचा वेग सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा वेग वाढत असताना प्रशासनाच्या वतीने केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी चांगले यश मिळत आहे. नागरिकांनी लसीकरणा सोबतच सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर अत्यावश्‍यकपणे केलाच पाहिजे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना संसर्गाचा जोर कमी होईल, असा अंदाज आहे. तरी देखील सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करून स्वतःची व कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी.

- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर

मे महिन्याची सुरवात चिंताजनक

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आल्यानंतर मे महिन्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. 1 व 2 मे या दोन दिवसांमध्ये 4111 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर मे महिन्याच्या दोन दिवसांत 87 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिना देखील नागरिकांना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com