
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले. पण, विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. त्यात चारचाकी वाहने असलेल्या, संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे. आता योजनेचा अकरावा हप्ता मेअखेर वितरित होणार आहे.