Pandharpur News: 'पंढरीत दीड लाख भाविकांची मांदियाळी'; मोक्षदा एकादशीदिवशी विष्णुपद मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ..

Mokshada Ekadashi crowd: वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल-रुक्मिणींच्या चरणी मनोकामना व्यक्त केल्या. प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पथकांची नियुक्ती केली होती. दर्शनासाठी चार ते सहा तास प्रतीक्षा करावी लागत असून, भाविकांनी संयम दाखवून दर्शन घेतले.
Mokshada Ekadashi special darshan draws huge crowds at Pandharpur’s Vishnupad Temple.

Mokshada Ekadashi special darshan draws huge crowds at Pandharpur’s Vishnupad Temple.

Sakal

Updated on

पंढरपूर : मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त सोमवारी (ता. १) सुमारे दीड लाख भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली होती. भाविकांच्या मांदियाळीने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिमद्वार परिसर गजबजून गेला होता. दरम्यान, श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यावरील तीन नंबरच्या पत्रा शेडमध्ये गेली होती. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा अवधी लागत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com