

Young participants perform with enthusiasm during the “Jallosh Lokkalacha” folk art competition; Mehta and Sangameshwar crowned winners.
Sakal
सोलापूर : बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या कार्यक्रमांतर्गत सोलापूरमधील बालकलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समूह नृत्य, एकल नृत्य, समूह गायन, एकल गायन आणि वाद्य वादन यासारख्या विविध कलाप्रकारांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील २५० बालकलावंतांनी सहभाग घेतला. समूह नृत्य स्पर्धेत मेहता प्रशाला, तर समूह गायन मध्ये संगमेश्वर पब्लिक स्कूल प्रथम क्रमांक मिळविला.