
-राजाराम माने
केत्तूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हक्काचा पाहुणचार झोडपण्यासाठी आलेले फ्लेमिंगो व इतर पक्षी उजनीचा पाहुणचार उरकून मायदेशी परतण्याच्या तयारीला लागले आहेत; तर विणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापुरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात चिंचेच्या झाडावर आलेले चित्रबलाक करकोच्यांनीही स्थलांतर करत राज्यासह भारतभर जाण्यासाठी आता आवराआवर सुरू केली आहे.