
MP Adv. Ujjwal Nikam: Pakistan’s surrender forced Indian Army to halt Operation Sindoor.
Sakal
सोलापूर : पहलगाम हल्ल्यामध्ये निरपराध लोकांना धर्म विचारून ठार मारण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तराचा निर्णय हा पूर्णपणे लष्कराने स्वतंत्र घेतला होता. पाकिस्तानी दहशतवादी स्थळांवर हल्ले केल्यानंतर भारत यशाने बेभान झाला नाही. पाकिस्तानी लष्करातून भारताला शरणागतीचा मेसेज आला म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबवले, अशी माहिती राज्यसभा खासदार डॉ. उज्ज्वल निकम यांनी दिली. विवेकानंद केंद्र सोलापूर शाखा यांच्या वतीने विश्वबंधुत्व दिनानिमित्त रंगभवन येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.