Solapur News:'साेलापुरमध्ये घरातील खोलीत लागलेल्या आगीत भाजून महिलेचा मृत्यू'; नेमकं काय घडलं, पल्लवी घरात एकटीच..

Pallavi Solapur house fire tragic incident: घरी पल्लवी एकटीच होती. तिचे पती प्रवीणसह दीर व सासू - सासरे बाहेर गेले होते. दुपारी ते बाहेरून आल्यावर घराच्या वरच्या खोलीला आतून कडी होती. दार उघडून पाहिले असता आगीत भाजल्याने ती बेशुद्ध पडली होती.
Scene from Solapur where a woman named Pallavi lost her life after a sudden fire in her house room.
Scene from Solapur where a woman named Pallavi lost her life after a sudden fire in her house room.Sakal
Updated on

सोलापूर: घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत लागलेल्या आगीत भाजून महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास विडी घरकुलमध्ये ही घटना घडली. पल्लवी प्रवीण सग्गम (वय ४०, रा. गडगी नगर, विडी घरकुल, सोलापूर) असे तिचे नाव आहे. खोलीला आतून कडी होती, त्यामुळे ही आत्महत्या असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तपासानंतरच नेमकी दुर्घटना कशी घडली, हे समजेल असेही पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com