
सोलापूर : विजापूर रोडवरील पनाश या अनधिकृत बहुमजली इमारत प्रकरणात संबंधित विकसकाने महापालिकेला विकास शुल्कापोटी अडीच कोटींचा चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विकसकाने दिलेले काही धनादेश संबंधित विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी बॅंकेत जमाच केले नाहीत, तर काही धनादेश बाउन्स झाल्याचे निदर्शनास आले आहे. धनादेशाबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आयुक्तांपासून लपवून ठेवली होती. दरम्यान, या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.