Chandrabhaga River in Pandharpur
esakal
उजनी धरणातून ८० हजार क्युसेक विसर्गामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.
पंढरपुरातील जुना पूल आणि वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
शेतकऱ्यांत पुरामुळे पिकांची भीती निर्माण झाली आहे.
पंढरपूर : भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी (ता. २७) दुपारपासून एक लाख क्युसेक इतका विसर्ग (Bhima River Flood) सुरू करण्यात आला होता, मात्र नंतर तो ८० हजार क्युसेक करण्यात आला. पंढरपुरात चंद्रभागा नदी (Chandrabhaga River in Pandharpur) दुथडी भरून वाहू लागली आहे. येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे, तर चंद्रभागा वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.