

Pandharpur Corridor Project Update Final Notification Issued Land Acquisition Starts With Housing and Shop Rehabilitation Plans
sakal
सोलापूर: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार १५ ऑक्टोबरला राजपत्राद्वारे ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे कॉरिडॉरसाठी आवश्यक जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया उद्यापासून (मंगळवार, ता. २०) सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी १५ एकर (६० हजार चौरस मीटर) जागेचे संपादन केले जाणार आहे.