Pandharpur Development Plan : व्यापाऱ्यांनी विरोध करू नये; कराडकर

वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर व विठ्ठल मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला आहे
Pandharpur Development Plan
Pandharpur Development Plan

पंढरपूर : वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर व विठ्ठल मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याला स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे लाखो भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशांनी विकास आराखड्याला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आज केले.

पंढरपूरच्या विकासात भर घालणारा प्रस्तावित कॉरिडॉर तयार करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुचविली आहेत. मंदिर परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी कॉरिडॉरला विरोध सुरू केला आहे. या संदर्भात सर्वपक्षीय समिती देखील स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत ठोस असे काही आश्वासन न मिळाल्याने सर्वपक्षीय समितीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या कॉरिडॉरचे स्वागत केले आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले की, विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या स्थानिक व्यापारी व रहिवाशांना राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत देऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. परंतु विकास कामाला व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी विरोध न करता आपल्या भावनांना मुरड घालावी, असे आवाहन कराडकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com