
पंढरपूर: ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथे एका ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यावर, पोटावर व छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सूर्यकांत देवाप्पा रेवे (वय ६५, रा. सध्या ओझेवाडी, ता. पंढरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.