Pandharpur News : माघी एकादशीला सुमारे चार लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा

माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी (ता. २०) माघी एकादशीला सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते.
Pandharpur
Pandharpursakal

पंढरपूर - पंढरीचा वास,चंद्रभागे स्‍नान। आणिक दर्शन विठोबाचें या निर्मळ भावनेने लाखो भाविकांनी माघी एकादशी दिवशी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर टाळ मृदंगासह नगरप्रदक्षिणेला निघालेल्या भाविकांच्या हरी नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्ती रसात चिंब झाली होती.

दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेड पर्यंत गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी सुमारे दिसते २१ तासांचा अवधी लागत होता.

माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी (ता. २०) माघी एकादशीला सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते. या भाविकांना सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची आस लागली होती. पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेत स्नान करण्यासाठी जमले होते.

मात्र यावर्षी माघी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. तरीदेखील उपलब्ध पाण्यातच भाविकांनी कसेबसे चंद्रभागा स्नान उरकले. तदनंतर श्री पुंडलिकाचे दर्शन घेत भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत सहभागी होताना दिसून आले. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेड पर्यंत गेली होती.

श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना आज साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. दरम्यान एकादशी दिवशी श्री विठ्ठल दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले आनंद दिनकरराव मोहिते (रा. सरवडी, ता. निलंगा, जि. लातूर) 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही सोमवारी दुपारी तीन वाजता दहा नंबरच्या पत्रा शेड मधील रांगेत उभे होतो. सुमारे २० ते २१ तासा नंतर श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. मंदिर समितीने दर्शन रांगेमध्ये पिण्याचे पाणी, खिचडी, कुलर, लाईव्ह दर्शन, विश्रांती कक्ष आदी सुविधा पुरवल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही.

भाविकांच्या गर्दीवर पोलिसांचे नियंत्रण -

चंद्रभागेत पवित्र स्नान केल्यानंतर दर्शन रांगेकडे जाताना भाविकांची महाद्वार घाट परिसरामध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने चंद्रभागेत स्नानासाठी जाणारे आणि स्नान करून दर्शन रांगेकडे जाणाऱ्या भाविकांची लोखंडी बॅरिकेटिंगचा वापर करत वेगवेगळी रांग केली होती. पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवत भाविकांना स्पीकर वरून सतत सूचना देत त्यांच्या सुरक्षिततेचही काळजी घेत असल्याचे दिसून आले़. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले स्वतः महाद्वार घाटावरील गर्दीवर लक्ष ठेवून होते.

क्षणचित्रे -

  • माघी एकादशीला सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल

  • चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाविकांची गैरसोय

  • महाद्वार घाट व नामदेव पायरी परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे योग्य नियोजन

  • श्री विठ्ठल दर्शनासाठी सुमारे २१ तासांचा अवधी

  • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप

श्री विठ्ठल मंदिर परिसर व महाद्वार घाटावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सहा रॅपिडक्शन फोर्स पथके तैनात करण्यात आली आहेत. तर भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ४ तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.

- डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com