Pandharpur News : श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट

चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवारी (ता.१९) साजरा होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात.
Pandharpur
Pandharpursakal

पंढरपूर - चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवारी (ता.१९) साजरा होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात. मात्र यंदा श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. चैत्री दशमी दिवशी गुरुवारी श्री विठ्ठलाच्या मुख दर्शनाची रांग सारडा भवन पर्यंत गेली होती. तर श्रींचे मुख दर्शनासाठी अवघा दीड तास लागत होता.

आषाढी, कार्तिकी, माघी यात्रे प्रमाणेच चैत्री यात्रेला देखील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला येत असतात. यावर्षीही चैत्री यात्रेला लाखो भाविकांचे आगमन होईल या अपेक्षेने श्री विठ्ठल मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. चंद्रभागा नदी तीरावरील ६५ एकर व गोपाळपूर पत्रा शेड दर्शन रांगेत भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मागील १५ मार्चपासून पुरातत्व विभागाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन व संवर्धनाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले असून केवळ मुखदर्शन सुरू आहे. पदस्पर्श दर्शन बंद असल्याने त्याचा परिणाम चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर देखील झाला आहे.

मागील वर्षी चैत्री दशमी दिवशी श्री विठ्ठलाच्या पददर्शनाची रांग तीन नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली होती. यावर्षी दशमी दिवशी दुपारी श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग जेमतेम सारडा भवन पर्यंतच गेली होती. तर पत्रा शेड दर्शन रांगेत एकही भाविक दिसून आला नाही. त्यामुळे यंदा चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले भाविक बाजीराव भाऊ कांबळे (रा.किणोशी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)' सकाळ ' शी बोलताना म्हणाले, आमच्या गावातील भजनी मंडळातील सर्व सदस्य दरवर्षी चैत्री यात्रेला येत असतो.

यंदा पदस्पर्श दर्शन बंद असल्याने भजनी मंडळातील सदस्य यात्रेला आले नाहीत. मी मात्र कुटुंबासह आज श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले व त्यावरच समाधान मानले. मात्र येत्या आषाढी यात्रेला येऊन श्री विठ्ठलाचे पद स्पर्श दर्शन आवर्जून घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com