

Sugarcane farmers push for pending payment release
sakal
पंढरपूर : येत्या आठ दिवसात उर्वरित 500 रुपयांचे थकीत ऊस बील द्यावे, अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा ऊस दर समितीचे समन्वयक व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते दिपक भोसले यांनी दिला आहे. विठ्ठल च्या थकीत ऊस दरासाठी ऊस दर समिती आक्रमक झाली आहे.शुक्रवारी (ता.8) ऊस दर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलचे अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांची भेट घेवून विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.