Tandulwadi mini truck falls into well
esakal
पंढरपूर : तांदूळवाडी येथील विहिरीत छोटा हत्ती कोसळल्याचे जवळच असलेल्या इरफान मुजावर या तरुणाने प्रत्यक्ष पाहिले. तत्काळ गावात फोन करून घटना सांगून सर्वजण लवकर या असा निरोप दिला. त्यानंतर लगेच स्वतः विहिरीत उडी घेऊन एका चिमुकल्याचे आणि अन्य तिघांचे प्राण वाचवले. प्रसंगावधान राखून दाखवलेल्या इरफान मुजावर याने (Irfan Mujawar heroic rescue in Pandharpur) दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.