

Chemical Treatment Planned for Lord Vitthal’s Idol After Damage Report
Sakal
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठलमूर्तीची पाहणी करून काही दिवसांपूर्वी अहवाल दिला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठलमूर्तीवर वज्रलेप केला जाईल, अशी माहिती आहे. या आधीही विठ्ठल चरणांची झीज झाली होती. त्यावेळी वज्रलेप (रासायनिक प्रक्रिया) लावण्यात आला होता.