

Devotees offering prayers and donations at Lord Vitthal’s feet in Pandharpur during the Kartiki Wari — temple receives ₹5.18 crore this year.
Sakal
पंढरपूर : नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेमध्ये भाविकांनी विठुरायाच्या दानपेटीत भरभरून दान अर्पण केले आहे. यात्रा काळात तब्बल पाच कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक कोटी ६१ लाख रुपयांची मंदिराच्या खजिन्यात भर पडली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली.