
पंढरपूर: संत नामदेव महाराजांनी समतेची आणि भागवत धर्माची पताका देशभरात फडकावली आहे. त्यांचा भागवत धर्माचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पंढरपुरात त्यांचे वैश्विक दर्जाचे स्मारक उभा केले जाईल. शिवाय त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धारदेखील करण्यात येईल. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली.