Devotees rejoice as Pandharpur temple announces 24-hour darshan of Lord Vitthal from October 26 — decision finalized in presence of Gahininath Maharaj.
Sakal
सोलापूर
भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'येत्या २६ पासून विठुरायाचे २४ तास दर्शन'; गहिनीनाथ महाराज; पूर्वनियोजन बैठकीत निर्णय..
२ नोव्हेंबर रोजी पहाटे २.२० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक ‘श्रीं’ची शासकीय महापूजा होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे यासाठी परंपरेनुसार २६ ऑक्टोबरपासून २४ तास दर्शन सुरू केले जाणार आहे.
पंढरपूर: कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. कार्तिकी यात्रेची मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.

