Pandharpur: पंढरपूरात समीकरणे बदलली, 'विठ्ठल'च्या विजयानंतर अभिजीत पाटलांनी या कारखान्यासाठी ठोकला शड्डू

काळेंसमोर पाटील-रोंगेंचे तगडे आव्हान
Pandharpur
Pandharpuresakal

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवारात पडलेली फूट सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्येही ती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील व डॉ. बी. पी. रोंगे यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. यंदाच्या कारखाना निवडणुकीमध्ये प्रथमच काळे यांच्यासमोर विरोधी अभिजित पाटील आणि डॉ. बी. पी. रोंगे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनीही काळेंच्या विरोधात रान उठवले आहे. पाटील-रोंगे-पवार यांच्या एकत्रित आव्हानाला काळे कसे तोंड देतात याकडेच पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Pandharpur
Raju Shetti: मोठी बातमी! राजू शेट्टींचा मतदारसंघ ठरला, स्वाभिमानी लढविणार लाेकसभेच्या सहा जागा

युवराज पाटील-गणेश पाटलांची भूमिका तळ्यात-मळ्यात

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले कल्याणराव काळे, युवराज पाटील आणि गणेश पाटील हे पुन्हा एकदा सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये युवराज पाटील यांच्या विरोधात कल्याणराव काळे यांनी प्रचार केला होता.

त्यामुळे आता युवराज पाटील व गणेश पाटील हे काळे यांना मदत करतील का? या विषयी चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे अभिजित पाटील यांचा वारू रोखण्यासाठी भगीरथ भालकेंसह युवराज पाटील, गणेश पाटील या सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान भगीरथ भालके यांनी काळे यांना पाठिंबा दिला असला तरी युवराज पाटील व गणेश पाटील यांनी आपली राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. त्यामुळे सध्या दोन्ही पाटील तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहेत. ऐनवेळी ते कोणती भूमिका घेतात याकडेही विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले आहे.

Pandharpur
Maharashtra HSC Result 2023: प्रतीक्षा संपली बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा रिझल्ट

विठ्ठल साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांची सत्ता आल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विठ्ठल परिवाराचा नेता म्हणून अभिजित पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातच श्री. पाटील यांनी विठ्ठल परिवार म्हणून बाजार समितीचीही निवडणूक लढवली.

त्यानंतर आता सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीतही श्री. पाटील यांनी लक्ष घातले आहे. कोणत्याही परिस्थिती कारखान्याची निवडणूक लढविण्याचा त्यांनी यापूर्वीच निर्धार केला आहे. त्यानुसार पाटील व रोंगे यांनी एकत्रित पॅनेलही तयार केले आहे. कारखाना निवडणुकीसाठी यंदा प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले.

तथापि काळे गटाने रोंगे, पवार यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्या. परंतु छाननीमध्ये या सर्वांचेच उमेदवारी अर्ज मंजूर झाले. विरोध गटाचे प्रमुख अर्ज मंजूर झाल्याने काळे गटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे काळे यांचे कट्टर विरोधक दीपक पवार यांनीही ताकद पणाला लावली आहे. पवार यांनी यापूर्वीच सभासदांच्या गाठीभेटी घेऊन पहिली फेरी पूर्ण केली.

कारखान्याची निवडणूक भाळवणी, भंडीशेगाव, गादेगाव आणि कासेगाव या चार प्रमुख गटामध्ये होणार आहे. यामध्ये बहुतांश सभासद हे भाळवणी व भंडीशेगाव या दोन गटात आहेत. या दोन्ही गटावर काळे यांचे सुरवातीपासूनच वर्चस्व आहे. दरम्यान, विठ्ठलच्या निवडणुकीनंतर येथील दोन्ही गटाचे राजकीय समीकरण बदले आहे.

काळे यांचे अनेक कार्यकर्ते आता अभिजित पाटील गटात सहभागी झाले आहेत. कल्याणराव काळे यांचे नातेवाईक असलेले अनेक जण सध्या त्यांच्याच विरोधात गेले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती अन्य दोन गटातही आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

कारखान्यावर काळे यांची गेल्या २२ वर्षापासून एक हाती सत्ता आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी काळे यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार असेच सध्याचे चित्र आहे. अजूनही थकीत ऊस बिलाचा व कामगारांच्या पगाराचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. हाच मुद्दा निवडणूक प्रचारात कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

काळे गटासाठी कारखान्याची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांना ही आता चांगलाच चंग बांधला आहे. काळे यांनी सभासदांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कल्याणराव काळे यांच्या मदतीला आता त्यांचे बंधू समाधान काळे यांनी मैदानात उडी घेतली आहे.

त्यांनी समांतर प्रचार यंत्रणा उभारली असून त्याद्वारे तरुणांना सक्रिय केले आहे. समाधान काळे यांच्या प्रचार यंत्रणेचा व त्यांच्या मुत्सदीगिरीचा या निवडणुकीत काळे गटाला फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

येत्या ५ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या काळात कोण उमेदवार कोणाच्या पॅनेलमधून निवडणूक लढवत हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीतच काळे यांना ही निवडणूक सोपी वाटत असली तरी सभासदांमध्ये काही प्रमाणात सत्ताधारी गटाविषयी नाराजीचा सूर आहे. सभासदांची ती नाराजी काळे कसे दूर करणार यावरही काळे गटाचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com