पंढरपूरच्या सुपुत्राची आसाममध्ये शानदार कामगिरी, निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

दिल्ली येथे खास कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
nitin khade
nitin khadesakal

पंढरपूर : आसाम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी(Chief Electoral Officer of the State of Assam) अाणि पंढरपूरचे सुपुत्र नितीन खाडे ( IAS nitin khade) यांनी आसाम राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. खाडे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात अाली असून त्यांना दिल्ली येथे खास कार्यक्रमात गौरवण्यात येणार अाहे.

nitin khade
सोलापूर : आठ वर्षांनंतरही सापडेना 'टीईटी' प्रमाणपत्र! शिक्षकांना शेवटची मुदत

आसाम मध्ये अतिरेकी, जातीय अाणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास अाहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या अाहेत. त्यामुळे निवडणूक काळात मतदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे अाव्हान होते. या आव्हानांचा गांभीर्याने विचार करून श्री. खाडे यांनी यंत्रणा राबवली.अनेक प्रकरणांमध्ये कायद्याचे उल्लंघन करताना दिसणाऱ्यांच्या विरुध्द एफअायअार दाखल करण्यासाठी त्वरीत अाणि प्रभावी कारवाई करण्यात अाली. सोशल मिडियावरुन अाणि प्रत्यक्ष शांतता अाणि सौदार्ह बिघडवणाऱ्या अनेक घटनांना वेळीच अाणि कठोर उपाय करुन अाळा घालण्यात अाला. पोलिस अाणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात अाला.

nitin khade
टीईटी नसलेल्या शिक्षकांना दिलासा.. वेतन स्थगित न करण्याबाबत आदेश

सहायक मतदान केंद्रांच्या निर्मितीमुळे मतदान केंद्रांची(voting center) संख्या पाच हजाराने वाढल्याने मनुष्यबळाची व्यवस्था अाणि त्यांचे प्रशिक्षण हे मोठे अाव्हान होते. या सर्व आव्हानांचा विचार करून श्री. खाडे यांनी नियोजन बद्ध काम केले.कोविड सह अनेक अाव्हाने समोर असताना देखील श्री.खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक अाणि काटेकोरपणे यंत्रणा राबवली. भारत निवडणूक अायोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने (indian election comission)घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात अाली अाहे. दिल्ली य़ेथे एका खास कार्यक्रमाचे अायोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार अाहे.

nitin khade
हिंजवडी आयटी पार्कजवळ आढळून आले बिबट्याचे तीन बछडे

ठळक मुद्दे...

  1. 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.

  2. कोविडचा प्रार्दुभाव असूनही(covid)

  3. 2019 च्या लोकसभा विधानसभा(loksabha election) निवडणूकीसाठी मतदान 0.5 टकके ने वाढले.मतदानावेळी कोविड च्य़ा अनुषंगाने सर्वती काळजी घेण्यात अाली.

  4. मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

  5. निवडणूक (election)निष्पक्ष अाणि सुरक्षित पार पाडली गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com